Home Breaking News संकल्प विजयाचा! भाजपची संघटनात्मक ताकद वाढवणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा...

संकल्प विजयाचा! भाजपची संघटनात्मक ताकद वाढवणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा – आमदार करणदादा देवतळे 

नागपूर :- भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेऊन वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांनीआगामी काळातील राजकीय रणनीती आणि पक्ष संघटना बळकटीकरणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी केवळ राजकीय घडामोडींचा आढावाच घेण्यात आला नाही, तर आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटनात्मक रचना अधिक आक्रमक आणि धारदार करण्यावर भर देण्यात आला. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पक्षविचार पोहोचवून ‘जनसंपर्क अभियाना’ला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ऊर्जा आहे,”

असे प्रतिपादन करत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विकासाभिमुख कामांना गती देण्याबाबत स्पष्ट दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आता अधिक जोमाने आणि प्रखरतेने मैदानात उतरणार असून, जनतेच्या प्रश्नांसाठी भाजपचा लढा अधिक आक्रमक होणार आहे. या सकारात्मक भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात भाजपची संघटनात्मक घोडदौड अधिक वेगाने सुरू राहणार आहे.