Home Breaking News आनंदाची बातमी : २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना आता अधिकृत ‘दिव्यांग’ म्हणून मिळणार...

आनंदाची बातमी : २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना आता अधिकृत ‘दिव्यांग’ म्हणून मिळणार मान्यता !

   💠महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय 💠
महाराष्ट्र सरकारने राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता तब्बल २१ प्रकारच्या व्यंग किंवा अक्षमता असलेल्या व्यक्तींना ‘दिव्यांग’ म्हणून अधिकृत मान्यता देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे अनेक गरजू व्यक्तींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. ज्या समस्यांना पूर्वी दुर्लक्षित केले जात असे, त्यांना आता मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
या निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या काही प्रमुख श्रेणी
खालील प्रकारच्या समस्यांचा यात समावेश आहे
👉   अंधत्व आणि अल्प दृष्टी
👉   कुष्ठरोगातून बरा झालेली व्यक्ती
👉   श्रवणदोष (बहिरेपणा आणि कमी ऐकू येणे)
👉   हालचाल अक्षमता आणि खुजेपणा
👉   बौद्धिक अक्षमता आणि मानसिक आजार
👉  ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि सेरेब्रल पाल्सी
👉   स्नायू विकृती आणि दीर्घकालीन मज्जासंस्थेचे आजार
👉  विशिष्ट अध्ययन अक्षमता आणि मल्टिपल स्क्लेरोसिस
👉  वाचा आणि भाषा अक्षमता
👉  थॅलेसेमिया, हिमोफिलिया आणि सिकल सेल रोग
👉  कर्णबधिर-अंधत्वासह बहुविध अपंगत्व
👉  ॲसिड हल्ल्यातील पीडित
           💠 गरजू व्यक्तींनी काय करावे 💠
ही माहिती गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा जिल्हा दिव्यांग कल्याण विभागात संपर्क साधावा, जेणेकरून शासकीय नियमांनुसार नोंदणी करता येईल.