Home Breaking News सावधान! वरोरा मतदारसंघातील ५९ हजार ६६८ मतदारांची नावे होणार ‘डीलीट’; ३१ मे...

सावधान! वरोरा मतदारसंघातील ५९ हजार ६६८ मतदारांची नावे होणार ‘डीलीट’; ३१ मे पूर्वी ‘हे’ काम न केल्यास मतदानाचा हक्क हिरावणार !

वरोरा :-वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मतदारसंघातील तब्बल ५९ हजार ६६८ मतदारांची नावे मतदार यादीतून कायमची वगळली (डीलीट) जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (S.I.R.) कार्यक्रम सुरू असून, ज्या मतदारांचे २००५ च्या मतदार यादीसोबत मॅपिंग पूर्ण झालेले नाही, त्यांची नावे यादीतून बाद केली जाऊ शकतात. ३१ मे २०२६ पूर्वी हे मॅपिंग पूर्ण करून घेण्याचे जाहीर आवाहन वरोराचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांनी केले आहे.
२०% मतदारांवर टांगती तलवार !
वरोरा-भद्रावती मतदार संघात एकूण २ लाख ८७ हजार ४१३ मतदार आहेत. यापैकी ८०% मतदारांचे मॅपिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित २०% म्हणजेच ५९,६६८ मतदारांचे मॅपिंग अजूनही प्रलंबित आहे. जर या मतदारांनी ३१ मे २०२६ पूर्वी आवश्यक ते पुरावे सादर करून मॅपिंग पूर्ण केले नाही, तर त्यांचे नाव मतदार यादीतून थेट वगळले जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
👉 तुमचे नाव यादीत आहे का  ? असे तपासा:
प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी मॅपिंग न झालेल्या मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी तयार केली आहे.
यादी पाहण्यासाठी लिंक: मतदार खालील गुगल ड्राईव्ह लिंकचा वापर करून मॅपिंग न झालेल्यांच्या यादीत आपले नाव शोधू शकतात :
गुगल ड्राईव्ह यादी लिंक
२००५ च्या यादीतील पार्ट व सिरीयल नंबर शोधण्यासाठी लिंक : निवडणूक आयोग शोध लिंक
👉 नाव असल्यास त्वरित काय करावे ?
१. जर तुमचे नाव मॅपिंग न झालेल्या यादीत समाविष्ट असेल, तर त्वरित आपल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) यांच्याशी संपर्क साधावा.
२. २००५ च्या मतदार यादीमधील आपला पार्ट नंबर आणि सिरीयल नंबर शोधून तो बी.एल.ओ. कडे जमा करावा.
३. नागरिकांच्या सोयीसाठी या यादीमध्ये संबंधित बी.एल.ओ. चे मोबाईल नंबर देखील देण्यात आले आहेत.
👉 प्रशासनाचा इशारा :-ऐनवेळी होणारी धावपळ आणि मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ टाळण्यासाठी वरोरा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने त्वरित आपले नाव तपासून ३१ मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांनी ‘प्रेसनोट’द्वारे केले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏