Home Breaking News सावधान… वरोरा येथील शिवाजी चौक परिसरात दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता; नगर परिषदेचे...

सावधान… वरोरा येथील शिवाजी चौक परिसरात दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता; नगर परिषदेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

वरोरा:-वरोरा शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नगर परिषदेने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. शिवाजी चौक परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती (लीकेज) लागल्याचे समोर आले आहे. या बिघाडामुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना आखल्या आहेत.
👉 नगर परिषदेचे नागरिकांना महत्त्वाचे निर्देश 👇
नगर परिषद प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना पुढील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
👉 पाणी उकळून प्या :- पुढील आदेश येईपर्यंत नळाद्वारे येणारे पाणी थेट न पिता ते पूर्णपणे उकळूनच वापरावे.
👉 वॉटर ए.टी.एम.चा वापर :- पिण्याच्या पाण्यासाठी शक्य असल्यास नगर परिषदेच्या ‘वॉटर ए.टी.एम.’ सुविधेचा वापर करावा.
👉 प्रशासनाला सहकार्य करा :-दुरुस्तीचे काम सुरू असून नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे.
संपर्क :- यासंदर्भात कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी थेट नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी, नगर परिषद वरोरा यांनी केले आहे.

शिवाजी चौक परिसरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

🙏 जय विदर्भ 🙏