वरोरा :
च्या जागेवरील कंपाऊंड भिंतीचे काम थांबवून कंपनीच्या कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात कोंढाळा परिसरातील ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शेतकरी नेते किशोर डुकरे व पत्रकार प्रवीण गंधारे यांच्यावर ग्रामस्थांना चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कंपनीचे कॉर्पोरेट अफेअर हेड आशीष अनील कुलकर्णी (वय ४३, रा. वडगाव, चंद्रपूर) यांनी फिर्याद दिली असून त्या आधारे वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास किशोर डुकरे (रा. आसाळा) यांच्या नेतृत्वाखाली कोंढाळा गावातील सुमारे ५० ते ७५ ग्रामस्थांनी कंपनीच्या मौजा कोंढाळा व निमसळा येथील जागेत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, संबंधितांनी कंपनीचे वॉल कंपाऊंडचे काम करणाऱ्या मजुरांना धमकावून काम बंद पाडल्याचा आरोप आहे.
तसेच आरोपींनी कंपनीचा ट्रक व जेसीबी अडवून कामात अडथळा निर्माण केला आणि कामगारांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेत प्रवीण गंधारे यांनी आरोपींना चिथावणी दिल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात हर्षद आवारी, संजय खिरटकर, ईश्वर देवतळे, प्रविण देवतळे, प्रभाकर गौरकर, प्रमीला गौरकार, धर्मेद्र ढेंगळे, समीर देवतळे, रमेश चिकटे, गोपाल पारखी, मंगेश चिकटे, इंद्रजीत देवतळे, विजय चिकटे, राजू विरूरकर, जगदीश पारखी, विपुल किन्नाके, अमोल देवतळे, विजय देवतळे, राकेश पारखी, चाखन गौरकर, पांडुरंग देवतळे, सुरेखा लभाणे, सुर्यभान शेरकुरे, बंडू पारखी, सविता देवतळे, कल्पना पायघन, शारदा बेलेकर, बेबी लालसरे, अनीता पारखी, ज्योती शिरसागर, लक्ष्मण सरपाते यांच्यासह इतर ३५ ते ५० जणांवर आरोप करण्यात आले आहेत.
पोलिसांनी प्रकरण क्रमांक ४५/२०२६ नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम १३५ तसेच भा.न्या.सं. कलम ३२९(३), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२), ३०९(४), ३५१(२), ३५२(३), १२६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तालेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे कोंढाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home Breaking News कोंढाळा आंदोलन प्रकरण तापले; किशोर डुकरे व प्रवीण गंधारे यांच्यावर चिथावणीचा आरोप,...




