11 November 2026News Website

जनसामान्यांचे नेते हंसराजभाऊ अहीरांच्या वाढदिनानिमित्त माढेळीत मसाला दूध वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम; भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला!

“माढेळीत सामाजिक उत्तरदायित्वाचा अनोखा सोहळा; आदरणीय ‘भैयां’च्या जन्मदिनानिमित्त ग्रामस्थांमध्ये जल्लोष व आनंद “

माढेळी  :- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, ओबीबीसीएफचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री. हंसराज भैया अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त माढेळी येथे अत्यंत उत्साही वातावरणात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जनमानसात आपल्या लोककल्याणकारी कार्यामुळे नेहमीच लोकप्रिय असलेल्या ‘भैयां’च्या जन्मदिनाचे औचित्य साधून माढेळी येथे नागरिकांना मसाला दूध वाटप करण्यात आले.



या सामाजिक उपक्रमात मतदारसंघातील प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. या विशेष प्रसंगी माजी सरपंच देवानंदजी महाजन, भाजप वरोरा ग्रामीण तालुका अध्यक्ष राजेंद्र सवाई, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील देवतळे, अतुल वारेकर, विनोद काहुरके, वैभव देवतळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. हंसरजाभाऊ अहीरांसारख्या खड्या नेत्याचा वाढदिवस केवळ राजकीय उत्सव न मानता, अशा प्रकारच्या लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांनी साजरा करणे हीच खरी त्यांच्याप्रती निष्ठा असल्याचे यावेळी उपस्थितांनी म्हटले.



जननेत्याचा वाढदिवस, माढेळीत सजला उत्साह, मसाला दुधाच्या वाटने, दुमदुमला माणुसकीचा थाट!

हंसराजभाऊंच्या नावाने, जगे साजरी झाली प्रीती, कार्यात त्यांच्या नेहमीच, दिसे सेनेची प्रचिती!

देवानंद महाजन, राजेंद्र सवाई, सुनील आणि अतुल सारे, सहभागाने या उपक्रमाचे, उजळले गावाचे वारे!

विकासकामांचा धडाका अन सामाजिक बांधिलकीची साक्ष, भैयांच्या वाढदिवसाची हीच खरी माढेळीची प्रत्यक्ष लक्ष!

अभिषेक किशोर भागडे