11 November 2026News Website

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराजजी भैया अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त वरोऱ्यात उत्साहात संपन्न झाले भव्य मसाला दूध वाटप!

वरोरा :- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा जनमानसात लोकप्रिय असलेले श्री. हंसराजजी भैया अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा शहरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी शहराच्या मुख्य भागात भव्य मसाला दूध वाटप सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

शहरातील आंबेडकर चौक येथे आयोजित या कार्यक्रमास जनतेचे लाडके तथा लोकप्रिय आमदार श्री. करणदादा देवतळे यांची विशेष उपस्थिती लाभली. आमदार श्री. करणदादा देवतळे यांच्या हस्ते व उपस्थितीत नागरिकांना मसाला दूध वाटप करण्यात आले. या उपक्रमाला वरोरा शहरातील नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व असा उदंड प्रतिसाद मिळाला.

भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता महिला आघाडी तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विशेष पुढाकाराने आणि उपस्थितीत हा वाढदिवस सोहळा संस्मरणीय ठरला. या दणदणीत कार्यक्रमामुळे संपूर्ण वरोरा शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

 

अभिषेक किशोर भागडे