वरोरा :- वर्धा जिल्ह्यातील वर्धा येथे 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत वरोराच्या फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट्स अकॅडमी चे विद्यार्थि सानिया राजेश आवारी, किरण मनोहर गोचे, रीतीक श्रीकृष्ण धवणे या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रथम स्थान पटकावून सुवर्ण पदक प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शहराचे नाव उच्च स्तरावर गौरविले आहे.
त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल फौजी वॉरियर्स मार्शल आर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख शिहान विनय बोढे, मुख्य प्रशिक्षक सेन्सई रवी चरुरकर व सेम्पाई घनश्याम खोंडे, सेम्पाई फकिरा निखाडे, सेम्पाई अश्विनी नरड, सेम्पाई शोन दसुडे तसेच अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर (माजी सैनिक व नगरसेवक), दिगंबर खापणे (माजी सैनिक), रवी तुराणकर (माजी सैनिक), हेमराज बेहरे (मराठा रेजिमेंट माजी सैनिक), बजरंग वानखडे (तायक्वांदो सचिव माजी सैनिक), गुरू राजू नकवे यांनी या सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





