Home जिल्हा ⭕ ग्रंथ दिंडीचे भाजपा तर्फे जल्लोषात स्वागत, बिस्किट व पाणी बॉटल चे...

⭕ ग्रंथ दिंडीचे भाजपा तर्फे जल्लोषात स्वागत, बिस्किट व पाणी बॉटल चे वाटप ⭕

ग्रंथ दिंडीचे भाजपातर्फे जल्लोषात स्वागत; बिस्कीट व पाणी बाटल्यांचे वाटप

वरोरा : शहरात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीचे भारतीय जनता पार्टी, वरोरा तर्फे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झालेल्या भाविक व नागरिकांसाठी बिस्कीट व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे, भाजपा शहराध्यक्ष संतोष पवार ( नगरसेवक ) भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत नाकाडे, महिला आघाडीच्या पदाधिकारी, तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा संपूर्ण उपक्रम आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. ग्रंथ दिंडीच्या स्वागतामुळे शहरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.