Home Breaking News Devendra Fadnavis : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका

Devendra Fadnavis : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका

देवेंद्र फडणवीसांची कळी खुलली

मुंबई (Mumbai) :-  विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवलाय. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे. राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करुन दाखवलाय. दरम्यान , निवडणुकीत यश मिळवल्यानंतर एबीपी माझाने पहिली प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले. कोणतेही भाष्य न करता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विजयी थंब दाखवला आणि सहकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

विधानपरिषद निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाय, शिंदेंच्या शिवसेनेचे मतं फुटलेले नाहीत.

कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार विजयी?

भाजपचे विजयी उमदेवार

1) योगेश टिळेकर – 26 मते
2) पंकजा मुंडे – 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे – 26 मते
5) सदाभाऊ खोत – 24

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार

1) भावना गवळी –
2) कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Ajit Pawar)

1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर

काँग्रेस विजयी उमेदवार

1) प्रज्ञा सातव – 26

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

1.) मिलिंद नार्वेकर

काँग्रेसकडून आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नाही
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत होता. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते.

Devendra Fadnavis first wife
Devendra Fadnavis age
Devendra Fadnavis cast
Devendra Fadnavis PA list
Devendra Fadnavis PA Contact Number
Devendra Fadnavis PA name
Devendra Fadnavis family
Devendra Fadnavis religion