Home क्राईम नागपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! पाचपावली पोलिसांच्या सतर्कतेने दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस; ६३,९९,४२०...

नागपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! पाचपावली पोलिसांच्या सतर्कतेने दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस; ६३,९९,४२० मुद्देमाल जप्त.

नागपूर  :- नागपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी पाचपावली पोलिसांच्या सतर्कतेने दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस ६३,९९,४२० मुद्देमाल जप्त.पोलिसांची मोठी कारवाई उत्कृष्ट कामगिरीबद्दल पो.हवा. प्रकाश पखान यांना प्रशस्तिपत्र प्रदान.नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे पाचपावलीच्या पथकाने अत्यंत चिकाटीने आणि कौशल्यपूर्ण रीतीने तपास करत दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी पाहिजे असलेल्या आरोपीचा माग काढून त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले असून, एकूण ६३,९९४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.



💥 अशी उघडकीस आली घरफोडी 💥
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे पाचपावली, नागपूर शहर येथे दाखल असलेल्या अप.क्र. ४४१/२०२६ कलम ३१०(२), ११५(२) भा.न्या.सं. अन्वय दाखल गुन्ह्यात अत्यंत चिकाटीने व कौशल्यपूर्ण रीतीने तपास सुरू होता. या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीचा माग काढून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपींकडे सखोल चौकशी व तपास करून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. सदर दोन्ही गुन्ह्यांमधून एकूण ६३,९९४२०/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे.



🙏 प्रशस्तिपत्र देऊन सत्कार 🙏
पोलीस ठाणे पाचपावलीचे पोलीस हवालदार प्रकाश पखान यांनी केलेल्या या सतर्क, धाडसी आणि कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून, गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. त्यांच्या या प्रशंसनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्तर प्रादेशिक विभाग, नागपूर शहराच्या अपर पोलीस आयुक्त विनीता साहू भापोसे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले आहे.