8 November 2026News Website

वणीत उत्साहात ‘मनसे गरबा महोत्सव २०२६’ चा भव्य शुभारंभ राजू उंबरकर यांच्या हस्ते आज संपन्न झाला उद्घाटन सोहळा

वणी :- पारंपरिक संस्कृती, दांडियाचा मनमोहक ताल आणि तरुणाईचा अभूतपूर्व उत्साह यांच्या संगमात वणी विधानसभा क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात ‘मनसे गरबा महोत्सव २०२६’ चा दिमाखदार शुभारंभ आज राम शेवाळकर परिसरामध्ये पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित या भव्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मनसेचे महाराष्ट्र राज्य नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख हस्ते आज अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.



माँ दुर्गेच्या भक्तीत आणि मनसेच्या शिस्तीत रंगलेला हा उत्सव वणीकरांसाठी यंदाही एक मोठी आनंदाची पर्वणी ठरला आहे. या महोत्सवात प्रेक्षकांसाठी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील विविध कलाकार हजेरी लावणार असून, हे या संपूर्ण महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच, या महोत्सवात हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, विविध वयोगटांमधील विजेत्यांसाठी लाखोंच्या बक्षिसांची मेजवानी असणार आहे.पुढील नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व मनसे पदाधिकारी, गरबा महोत्सव समितीचे सर्व सदस्य आणि शिस्तप्रिय महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात पार पडत असून, पारंपरिक वेशभूषेत सज्ज होऊन दांडियाच्या तालावर थिरकण्यासाठी वणीकरांनी महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



मराठी आणि हिंदी सिने सृष्टीतील विविध कलाकार लावणार हजेरी

पुढील नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि उत्सवात रंग भरण्यासाठी मराठी आणि बॉलिवूड क्षेत्रातील विविध लोकप्रिय सिनेकलाकार व मालिकांमधील चेहरे आपली विशेष उपस्थिती लावणार आहेत. सिनेतारकांच्या या उपस्थितीमुळे महोत्सवाची रंगत आणखीनच वाढणार असून वणीकरांसाठी हा एक पर्वणीचा काळ असणार आहे.



🙏 लाखोंच्या बक्षिसांची असणार मेजवानी 🙏
यंदाच्या या महागाजलेल्या महोत्सवात हजारो स्पर्धकांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गरबाप्रेमी तरुणाईसाठी स्पर्धा अतिशय चुरशीची होणार असून, विविध वयोगटांमधील विजेत्यांसाठी लाखो रुपयांच्या मूल्याची विविध आकर्षक आणि मौल्यवान बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

अभिषेक किशोर भागडे