वरोरा :- आर्य क्षत्रीय तेलगू शिंपी समाज, वरोरा यांच्या वतीने आयोजित श्री नवरात्र महोत्सव व स्नेहमिलन सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीने या कार्यक्रमाची शान वाढवली. समाजातील एकोपा, आपुलकी आणि स्नेहभाव अधिक दृढ करणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष मा. सौ. अर्चनाताई आशिष ठाकरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासह नगरसेवक प्रवीणभाऊ चिमूरकर, नगरसेविका नुपूरताई तेला, नगरसेवक अक्षय भिवदरे, नगरसेविका लताताई हिवरकर, नगरसेवक खेमराज कुरेकार, भारतीताई श्रीकोंडेवार, मंजुषाताई संगेवार, शशांकजी डोंगरवार, सतीशजी डोंगरवार आणि राहुलजी डोंगरवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“अशा सोहळ्यांमुळे समाजातील बंधुभाव आणि सलोखा अधिक घट्ट होतो,” असा सूर उपस्थितांमधून उमटला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि मिळालेल्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल आयोजकांचे उपस्थितांनी मनःपूर्वक आभार मानले.





