Home विदर्भ पांढरकवड्यात शेतकरी बांधवांसोबत उत्साहात रंगला बैलपोळा; आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या उपस्थितीत...

पांढरकवड्यात शेतकरी बांधवांसोबत उत्साहात रंगला बैलपोळा; आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या उपस्थितीत बळीराजाचा सन्मान.

पांढरकवडा :-शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा खरा आधारस्तंभ आहे, याच भावनेतून पांढरकवडा येथील आठवडी बाजार परिसरात बैलपोळ्याचा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी शेतकरी बांधवांचे लाडके दैवत आणि शेतीतील सोबती असलेल्या बैलांचे पूजन करत आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी बळीराजाच्या कष्टाला आणि योगदानाला मानाचा मुराद अर्पण केला.



शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सातत्याने अग्रेसर राहणारे आणि त्यांच्या प्रत्येक व्यथेची जाण असणारे जनमानसातील नेते म्हणून आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांची ओळख आहे. या प्रसंगी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी, समस्या आणि भावना अत्यंत आत्मीयतेने जाणून घेतल्या. बळीराजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ठाम भूमिका त्यांनी या वेळी बोलून दाखवली.
“शेतकरी राजा रात्रंदिवस काबाडकष्ट करून संपूर्ण जगाची पेटपूजा भागवतो. त्यांच्या कष्टाचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देणे हेच आमचे मुख्य कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आमची केवळ राजकीय भूमिका नसून आमचे कर्तव्य आहे,” असा विश्वास आ. तोडसाम यांनी या वेळी व्यक्त केला.



परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाला एका मोठ्या लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने संपूर्ण पांढरकवडा परिसरात शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून, बळीराजाच्या हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या लाडक्या आमदारांचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले.