Home जिल्हा वरोरा येथील लोकमान्य विद्यालयात बाप्पाच्या रूपाला विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची जोड; शाडू मातीच्या मूर्तीतून...

वरोरा येथील लोकमान्य विद्यालयात बाप्पाच्या रूपाला विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची जोड; शाडू मातीच्या मूर्तीतून साकारले सुंदर व आक्रमक बाप्पाचे रूप!

वरोरा :- लोकमान्य शाळेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याच्या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे अप्रतिम प्रदर्शन घडवले. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वसलेल्या बाप्पाच्या सुंदर आणि तितक्याच आक्रमक रूपाला त्यांनी मातीच्या मूर्तीमधून सजीव केले आहे.आज
दिनांक ९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेचे ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे.



उत्स्फूर्त सहभाग :- शाळेतील ७२ चिमुकल्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडवत पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.
मार्गदर्शन :- कलाशिक्षक श्री. अविनाश कांबळे यांच्या तसेच लोकमान्य विद्यालय वरोरा च्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा सकाळी ९ ते ११.३० व दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत उत्साहात पार पडली.
कलागुणांना वाव :- स्वतःच्या हाताने बाप्पाची सुंदर व मनमोहक मूर्ती बनवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह काही निराळाच होता.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुनांना व त्यांच्या कल्पकतेला या उपक्रमामुळे एक योग्य व्यासपीठ मिळाले असून, वृत्तपत्रात छायांकित करण्यासाठी ही एक प्रेरणादायी बातमी ठरली आहे.