Home जिल्हा मनीष जेठाणी कडून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण; वरोरयात कौतुकास्पद उपक्रम.

मनीष जेठाणी कडून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण; वरोरयात कौतुकास्पद उपक्रम.

वरोरा :- वरोरा येथील विवेकानंद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी वरोरा नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती मनीष जेठाणी यांनी स्वखर्चातून पुस्तकांची व्यवस्था करून त्यांचे वितरण केले.



प्रेरणा व पार्श्वभूमी :- शाळेतील काही विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तके नसल्याचे निदर्शनास आल्यावर जेठाणी यांनी स्वतःच्या बालपणीच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन एकाही विद्यार्थ्याला पुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून हा पुढाकार घेतला.



विद्यार्थ्यांना मार्गदर्शन :-“हे पुस्तक केवळ भेट नसून तुमच्या हातातील शस्त्र आहे, त्याचा योग्य उपयोग करून मोठे व्हा आणि भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्या,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले व मन लावून अभ्यास करण्यास सांगितले.



मान्यवरांच्या उपस्थिती :- या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी मशारकर, ज्ञानेश्वर माथनकर, अरुण ढोके, पुरुषोत्तम पिजदूरकर, रमेश पेचे आणि रामदास भोयर उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार :- कार्यक्रमाचे संचालन माहूरले यांनी केले, तर आभार नीता एकरे यांनी मानले.