Home राष्ट्रीय केंद्रीय कोळसा मंत्र्यांसमवेत आमदार करणदादा देवतळे यांची महत्त्वपूर्ण भेट; प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या...

केंद्रीय कोळसा मंत्र्यांसमवेत आमदार करणदादा देवतळे यांची महत्त्वपूर्ण भेट; प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या प्रश्नांवर आक्रमक चर्चा

नवी दिल्ली :-केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री माननीय श्री. जी. किशन रेड्डी यांची नवी दिल्ली येथे आमदार करणदादा देवतळे यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी माझी खासदार हंसराज (भैय्या )अहिर यांनी या  उच्चस्तरीय बैठकीत कोळसा आणि खाण क्षेत्राशी संबंधित विविध ज्वलंत व महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी या प्रसंगी विविध प्रलंबित मागण्या आक्रमकपणे मांडण्यात आल्या.



🙏  बैठकीतील प्रमुख मुद्दे व मागण्या 🙏
प्रकल्पग्रस्तांना न्याय व प्रति एकरी ३० लाख मोबदला कोल इंडिया (Coal India) आणि वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) च्या प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिक बेरोजगारांच्या प्रलंबित मागण्यांवर यावेळी सखोल चर्चा झाली. जमीन संपादनाचा योग्य मोबदला आणि हक्काची नोकरी मिळण्याबाबतच्या समस्यांवर भर देत, जमीन संपादनाचा मोबदला नोकरीसह प्रति एकरी ३० लाख रुपये करण्यात यावा, ही महत्त्वाची मागणी लावून धरण्यात आली.



खाजगी कंपन्यांच्या मनमानीवर वारेमाप प्रहार केपीसीएल (KPCL) आणि अरबिंदो या खाजगी कंपन्यांकडून स्थानिक लोकांची होत असलेली पिळवणूक, रखडलेल्या नोकऱ्या, प्रलंबित मोबदला, पुनर्वसन आणि वेतनाचे प्रश्न यांसारख्या गंभीर तक्रारींवर आवाज उठवण्यात आला.



कोल कंट्रोलर’मार्फत उच्चस्तरीय चौकशीची मागणी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) आणि अरबिंदो कंपनीकडून सुरू असलेले अवैध खनन, कराराचे उल्लंघन आणि अधिक उत्पादनातून होत असलेली अफरातफर यांसारख्या गंभीर प्रकारांची ‘कोल कंट्रोलर’मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.



नागपूर येथे ‘डब्ल्यूसीएल’ची विशेष बैठक घेण्याची सूचना कोळसा क्षेत्राशी संबंधित या सर्व गंभीर समस्यांवर तात्काळ आणि प्रभावी तोडगा काढण्यासाठी नागपूर येथे ‘डब्ल्यूसीएल’ची (WCL) विशेष बैठक आयोजित करावी, अशी सूचनाही माननीय मंत्र्यांना करण्यात आली.