घुग्घुस:- आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीतर्फे सोमवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी रुग्णांची १०८ वी तुकडी विविध आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी शालिनीताई मेघे रुग्णालयात ७० रुग्णांची तुकडी नगर सेवक विवेक बोढे यांच्या नेतृत्वात रवाना करण्यात आली.
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन प्रयास सभागृहात ३० जुलै रोजी करण्यात आले होते.
यात तब्बल ५ हजार २८१ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती यातील ७२ रुग्णांची तुकडी नि:शुल्क विविध आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आली.
याप्रसंगी नगर सेवक विवेक बोढे म्हणाले, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर आहे, रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया व उच्च दर्जाची सुविधा देण्यात येणार आहे. मागील १६ वर्षांपासून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत शेकडो रुग्णांनाची तुकडी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रवाना करण्यात आली आहे.
यावेळी नगर सेवक विवेक बोढे, नगर सेविका चैताली सातपुते, वैशाली ढवस, भाजपाचे सुरेंद्र जोगी, धनराज पारखी, विक्की सारसर, असगर खान, उमेश दडमल, हनुमान खडसे, सुनंदा लिहीतकर व नागरिक उपस्थित होते.




