Home महाराष्ट्र शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन कोल्हापूर ते राजभवनपर्यंतचा प्रेरणादायी...

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन कोल्हापूर ते राजभवनपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास थांबला शिक्षण जगतात शोककळा.

कोल्हापूर :-दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल, कुशल प्रशासक आणि लोकनेते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान द्रष्टे नेते आणि शिक्षणतज्ज्ञ गमावले आहेत.



🙏प्रारंभिक जीवन व संघर्षमय प्रवास🙏
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप गावातील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी आपल्या अंगातील प्रशासकीय कौशल्याच्या बळावर जीवनात मोठी शिखरे सर केली. १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून, तर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले. राजकारणातून हळूहळू निवृत्ती घेत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला समर्पित केले.



🙏शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक कार्य🙏
सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे या उदात्त हेतूने त्यांनी ‘डी. वाय. पाटील ग्रुप’ची स्थापना केली. १९८३ मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची स्थापना करून उच्च शिक्षणाचा पाया रचला. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५० हून अधिक शैक्षणिक संस्था आणि अनेक विद्यापीठे कार्यरत असून, लाखो विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले होते.



🙏 अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार तपशील 🙏
अंतिम दर्शन :- बुधवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोल्हापूरमधील कसबा बावा येथील ‘यशवंत निवास’ येथे ठेवण्यात येणार आहे.
अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार त्यानंतर निघणाऱ्या अंत्ययात्रेनंतर कसबा बावा येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



🙏 शोकसंतप्त परिवार 🙏
पाटील कुटुंबिय, आप्तस्वकीय, सर्व डी. वाय. पाटील ग्रुप परिवार व लाखो विद्यार्थी.
“अशा महान शिक्षणमहर्षींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या पवित्र आत्मास चिरंतन शांती देवो.”