Home Breaking News विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी वरोरा येथे ‘लक्षवेधी आंदोलन व निदर्शने’!

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी वरोरा येथे ‘लक्षवेधी आंदोलन व निदर्शने’!

वरोरा :- विद्यार्थ्यांच्या न्याय हक्क व उज्ज्वल भविष्यासाठी दिनांक :-२२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता , डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वरोरा येथे एका भव्य  ‘लक्षवेधी आंदोलन व निदर्शनांचे’ आयोजन करण्यात आले आहे.



सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक धोरणांविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
🙏 आंदोलनाचे प्रमुख मुद्दे 🙏
1. नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवस्थापनाची सखोल चौकशी  परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
2. विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक धोरणांचा जाहीर निषेध विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवणे.
3. पारदर्शक, न्याय्य व विद्यार्थी-केंद्रित परीक्षा प्रणाली शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धती पूर्णपणे पारदर्शक व विद्यार्थीभिमुख लागू करावी.
4. उज्ज्वल भविष्यासाठी ठोस उपाययोजना. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी पावले उचलावीत.
5. दिल्ली जंतर-मंतरवरील लाठीचार्जचा निषेध  दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा जाहीर निषेध करणे.
👉 आंदोलनातील मुख्य मागण्या
💥  विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे!
💥 “न्याय हवा! भविष्य हवे!!” आणि “शिक्षण हक्क व्यापार नाही!” हा नारा देत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
💥 आवाहन 💥
समस्त जनतेने सहपरिवार, तसेच सर्व विद्यार्थी, सामाजिक, धार्मिक, व्यापारी व समस्त राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
टीप :-पाऊस असल्यास सर्वांनी  छत्री सोबत आणावी व या आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे.
🙏 निलेश भालेराव, वरोरा. 🙏