Home Breaking News वरोराचा सुपुत्र मोहक चवले महाराष्ट्र सीईटी परीक्षेत राज्यात प्रथम; ‘श्री रंगनाथ स्वामी’...

वरोराचा सुपुत्र मोहक चवले महाराष्ट्र सीईटी परीक्षेत राज्यात प्रथम; ‘श्री रंगनाथ स्वामी’ पतसंस्थेतर्फे गौरव

वरोरा :- महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेत (MHT-CET) वरोरा येथील रहिवासी मोहक संदीप चवले याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून एक नवा इतिहास रचला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल ‘श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था’ वरोरा शाखेच्या वतीने त्याच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला. वरोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
👉 यशाचा जल्लोष
मोहक चवले याने आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर राज्यात अव्वल स्थान पटकावले. त्याच्या या घवघवीत यशामुळे वरोरा शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झळकले असून, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मोहकच्या या कामगिरीमुळे शहराची मान अभिमानाने उंचावली आहे.
🙏 पतसंस्थेकडून सत्कार व शुभेच्छा 🙏
या यशाची दखल घेत ‘श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था’च्या वतीने मोहकच्या निवासस्थानी उपस्थित राहून त्याचे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे संचालक श्री. परीक्षित एकरे , शाखा व्यवस्थापक. श्री. विलास बोबडे, तसेच  श्री. मिलिंद गोंडे, श्री. बेलेकर, श्री. विकास पारखी, श्री. हरिदास एकरे आणि श्री. ठेंगणे हे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहकच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी मोहकचे वडील श्री. संदीप चवले , त्याची माता आणि आजी उपस्थित होते. मुलाच्या यशाने आपल्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. वरोरा सारख्या छोट्या शहरातून येऊन एका विद्यार्थ्याने राज्यस्तरावर अव्वल स्थान मिळवल्यामुळे, मोहक चवले हा आता तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.