Home Breaking News चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई: गुटखा माफियांवर ‘मिनी मोक्का’

चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई: गुटखा माफियांवर ‘मिनी मोक्का’

चंद्रपूर  :- चंद्रपूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध व्यापाराविरुद्ध मोठी धडक मोहीम राबवली आहे. रामनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांतर्गत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई केली आहे.
कारवाईचा तपशील 
अपराध क्र. ६५८/२०२६ यामध्ये टोळी प्रमुख वसीम अख्तर झिमरी (रा. घुटकाळा बोर्ड, चंद्रपूर) आणि सदस्य सिद्धांत माधव गोंडाणे व मो. अखिल शकील शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अपराध क्र. ६६४/२०२६ यामध्ये टोळी प्रमुख जयसुखलाल अंबाराम ठक्कर (रा. विवेकानंद बोर्ड, बल्लारपूर) आणि सदस्य अजयकुमार विजयकुमार गुंडोजबार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. हे आरोपी आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांतही त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.
ही मोहीम चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केली आहे.