नागरी :- महिला व ५७ किलो वजन गटातील पुरुषांच्या संघांना सहभागाचे आवाहन; विदर्भातील नामांकित संघ सहभागी होणार.नागरी येथील जय हिंद युवक क्रीडा मंडळाच्या वतीने शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य एकदिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महिलांचा खुला गट तसेच पुरुषांचा ५७ किलो वजन गट अशा दोन गटांमध्ये सामने रंगणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जय हिंद युवक क्रीडा मंडळ, नागरी यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेला विदर्भातील कबड्डीप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत असून दरवर्षी विदर्भातील नामांकित कबड्डी संघ मोठ्या संख्येने सहभागी होतात.
यंदाही स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिके व चषक ठेवण्यात आले आहेत. तसेच खेळाडूंसाठी उत्तम क्रीडा व्यवस्था आणि स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा तिरुपती बालाजी संस्थान च्या पटांगण नागरी येथे पार पडणार आहे.
तरी विदर्भातील जास्तीत जास्त नामांकित कबड्डी संघांनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी, असे आवाहन जय हिंद युवक क्रीडा मंडळ, नागरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.





