सुमठाणा (ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) :- शिक्षण विभाग, पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने सेंट ॲन्स हायस्कूल, सुमठाणा येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. “शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष” या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती आणि बदलत्या काळाची गरज ओळखण्याची दृष्टी ठळकपणे समोर आली.
उद्घाटन सोहळ्यानंतर प्रदर्शनातील विविध प्रकल्पांची पाहणी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पक मांडणीतून साकारलेले विज्ञान प्रकल्प उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.या सोहळ्याला चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच सेंट ॲन्स शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सिस्टर सबिना मॅथ्यू, गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. बंडुजी आकनूरवार, नगरसेविका सौ. उर्वेलाताई साव, नगरसेविका सौ. रंजना गिरडकर, गट शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, प्रिन्सिपल सिस्टर मर्सी थॉमस, शिक्षण विभाग अधिकारी श्रीमती स्वाती महाजन, केंद्रप्रमुख प्रशांत जांभूळकर, कु. ज्ञानदेवी वानखेडे, अरविंद नौकरकर, विपिन धाबेकर, मोरेश्वर विद्ये, संदीपकुमार गेडाम आणि कु. सुचिता कुळे यांच्यासह विविध पदाधिकारी, शिक्षकवृंद, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





