Home Breaking News स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोऱ्यात अभिवादन; आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोऱ्यात अभिवादन; आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम

वरोरा :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोरा येथील वीर सावरकर चौकात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी सावरकरांच्या ध्येयवादी विचारांचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर 
या सोहळ्याला प्रामुख्याने  वरोरा शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष पवार , भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे , मिलिंद देशपांडे , गजाननजी राऊत , अमित चवले , जगदीश तोटावर , दीपक घुडे , पंकज जाधव , विलास दारापूरकर , सचिन तडस , संजय दानव , ज्योतीताई मोहितकर , गोरकर ताई , मुंजे ताई , दुर्गे ताई आणि नलिनीताई आत्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांचे आभार मानण्यात आले.