8 November 2026News Website

Nashik – ट्रकची धडक बसून तरुणाचा मृत्यू

नाशिक, 10 जुलै :- नाशिक शहरातील सातपूर परिसरामध्ये पेट्रोल पंपावरून निघालेल्या एका ट्रकने युवकाला चिरडण्याची घटना घडली आहे त्यानंतर हा ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सातपूर परिसरात असलेल्या पपया नर्सरी जवळील मांगल्य पेट्रोल पंपा जवळ ही दुर्दैवी घटना घडली या पेट्रोल पंपावरून डिझेल भरून ट्रक हा सातपूर रस्त्याकडे जात असताना या रस्त्यावरून जाणारा युवक सरफो उद्दीन अंसारी याला ट्रक चालकाने जोरदार धडक दिली त्यामध्ये हा युवक मृत्यू झाला तर ट्रकचालक अपघात झाल्यानंतरही न थांबता तिथून पळून गेला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे

अभिषेक किशोर भागडे