7 November 2026News Website

Bhandara : कोट्यवधींच्या धान घोटाळा प्रकरणी ६ आरोपींची तुरुंगात रवानगी

भंडारा, २ जुलै :- भंडारा जिल्ह्यातील सहा राईस मिलचा 12 कोटी 50 लाख रुपयांच्या धान खरेदी अपहार प्रकरणात समावेश असल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आल्याने सीआयडीने सहा आरोपींना अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांचे जामीन फेटाळल्याने ६ आरोपींची तुरूंगात रवानगी करण्यात आली. तर उर्वरीत एका आरोपीला उशीरा अटक झाल्याने त्यास न्यायालयात हजर करता आले नाही. महेश कहाळकर (३५) , सुरेंद्र वहीले (५१) ताराचंद काहालकर (६५) भारत ठाकरे (५८) रामलाल बांडेबुचे (५५), माणिक बोदरे (६५), असे तुरुंगात रवानगी करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर तुमसर चे आमदार (राष्ट्रवादी,अजित पवार) राजू कारेमोरे यांचा भाऊ विश्वनाथ कारेमोरे (४३) रा. वरठी याला उशीरा अटक करण्यात आली. या कारवाई मुळे धान खरेदी केंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

अभिषेक किशोर भागडे