8 November 2026News Website

गोंदियात कंटेनरची दुचाकीला धडक

गोंदिया : गोंदियातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आज सकाळी भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, 15 वर्षीय मुलगा या अपघातात जखमी झाला आहे. चंद्रशेखर साखरे (45) हे आपल्या दुचाकीने कोहमारावरून देवरी कडे जात होते.

दरम्यान, नागपूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने डोंगरगाव जवळ त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार चंद्रशेखर साखरे हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा 15 वर्षीय मुलगा मासूम हा जखमी झाला असुन त्याला उपच्चारासाठी देवरी येथे दाखल करण्यात आले आहे.

अभिषेक किशोर भागडे