Home Breaking News भंडाऱ्यातील बोरगाव-धनेगाव रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन

भंडाऱ्यातील बोरगाव-धनेगाव रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन

भंडारा  : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील धनेगाव बोरगाव रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. सद्या धान पिक कापणी सुरू असुन शेतकरी शेतात असताना गावासेजारी असलेल्या शेतात वाघ दिसल्याने शेतकऱ्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती वनविभागाला देण्यात आली असुन वनविभागाची टीम घटणास्थळी दाखल झाली व वाघाला जंगलाच्या दिशेने हाकलून लावण्यात येत आहे. या वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.