Home जिल्हा टेमूर्ड्यात बिअर बार सुरू झाल्यास महिलांचा तीव्र आंदोलनाचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

टेमूर्ड्यात बिअर बार सुरू झाल्यास महिलांचा तीव्र आंदोलनाचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

टेमूर्डा / चंद्रपूर :- टेमूर्डा येथील शिक्षक कॉलनीमध्ये बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिल्यास परिसरातील महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रकरणी चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन महिलांनी निवेदन सादर केले आहे.



💥 महिलांची आक्रमक भूमिका 💥
ग्रामीण भागात आणि वर्दळीच्या ठिकाणी बिअर बार सुरू करण्यास आमचा तीव्र विरोध असल्याचे महिलांनी स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी बिअर बारचे बांधकाम सुरू आहे, त्याच परिसरात शाळा, दवाखाना, पोस्ट ऑफिस, वाचनालय, अंगणवाडी आणि रहिवासी क्षेत्र आहे. याठिकाणी वरदळीचा रस्ता तसेच शालेय मुलांचा येण्या-जाण्याचा मार्ग असल्याने येथे बिअर बार सुरू होणे गावकऱ्यांच्या हिताचे नाही, असे महिलांचे म्हणणे आहे.



ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव असताना तसेच पोलीस स्टेशनचा अहवाल नकारात्मक असतानाही प्रशासनाने या गोष्टीला अजून पर्यंत कसलीही मंजुरी दिलेली नाही. जर प्रशासनाने या बार ला परवानगी दिल्यास.या प्रकारामुळे गावातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, अशी भीती महिलांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन :- महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धाव घेऊन निवेदन दिले. प्रशासनाकडून या प्रकरणात कोणत्याही प्रकारची मंजुरी दिली जाणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यावेळी  खालील प्रमाणे गावातील महिलां उपस्थित होत्या 1) सौ. संगीता गो. आगलावे
माजी सरपंच गट ग्रामपंचायत टेमूर्डी 2) सौ. उज्वला दि. नक्षीनें 3) सौ. डॉ. चैताली स. पाकमोडे 4) संगीता रविंद्र तिखट ग्राम पंचायत सदस्य टेमूर्डी 5) सौ. मंजूषा दि. ठाकरे प्रशासनाच्या या आश्वसनाबद्दल महिलांनी आदर व्यक्त केला असला, तरी भविष्यात असे बार सुरू झाल्यास महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.टेमूर्डा येथील अनेक महिला उपस्थित होत्या.