चिमूर :- शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर ठाम विश्वास ठेवत, चिमूर तालुक्यात २५ नवयुवकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, आंबोली चौरस्ता येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत हा, युवा शक्तीच्या जोरावर पक्ष संघटना अधिक मजबूत करणारा महत्त्वपूर्ण प्रवेश सोहळा पार पडला.
माजी खासदार तथा पक्ष सचिव विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम आणि जिल्हाप्रमुख भास्कर भाऊ ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चिमूर तालुकाप्रमुख वैभव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ध्वजाचे पूजन करून करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख भास्कर ताजने, उपजिल्हाप्रमुख अमित आखाडे, विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते, चिमूर तालुकाप्रमुख वैभव ठाकरे, माजी तालुकाप्रमुख सुधाकर निवटे, तालुका संघटक केवलसिंग जुनी, समन्वयक बंडू पिसे, उपतालुका प्रमुख गोलू गेडाम व राजेंद्र जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
💥 तरुणाईचा सहभाग आणि निर्धार 💥
मारोती महादेव मसराम, बादल मंडल, राहुल क्षीरसागर, विक्की लहाने, गोलू मसराम, शुभम माळवे, सुरज धुर्वे, अमित जांभुळे, आशिष ठाकरे, रोहित बोभाटे, प्रफुल देशकर, महेश तुकडू ठाकरे आणि लोकेश मुरकुटे यांच्यासह २५ नवयुवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या नव्या प्रवेशामुळे चिमूर तालुक्यात शिवसेनेच्या युवा संघटनेला मोठे बळ मिळाले असून, गावागावात भगवा अधिक जोमाने फडकविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठविण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख वैभव ठाकरे यांनी केले तर संचालन विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी पार पाडले. प्रशांत नागपुरे, प्रफुल देशकर, मारोती मसराम, समीर बल्की आणि शुभम माळवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने या जोशपूर्ण बैठकीची सांगता झाली.




