Home Breaking News वरोऱ्यात भाजपचा शक्तिप्रदर्शन! नवनियुक्त जिल्हा ओबीसी अध्यक्ष सुरेश महाजन यांच्या निवासस्थानी दिग्गजांची...

वरोऱ्यात भाजपचा शक्तिप्रदर्शन! नवनियुक्त जिल्हा ओबीसी अध्यक्ष सुरेश महाजन यांच्या निवासस्थानी दिग्गजांची उपस्थिती.

वरोरा :-भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला बळ देत, चंद्रपूर जिल्हा ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेले श्री. सुरेशजी महाजन यांच्या निवासस्थानी आज एका अभूतपूर्व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपचे दिग्गज नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला.




💠दिग्गजांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह💠
या सदिच्छा भेटीवेळी मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकप्रिय महापौर सौ. संगीताताई खांडेकर, भाजप नेते श्री. राहुलजी पावडे, जेष्ठ नेते डॉ. रमेशजी राजुरकर, (भा. ज. पा.जिल्हा उपाध्यक्ष ) विनोद लोहकरे, माजी नगराध्यक्ष राजेशजी साकोरे यांच्यासह पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




💠 महिला आघाडीचा सक्रिय सहभाग 💠
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महिला आघाडीची लक्षणीय उपस्थिती होय. सौ. सुनीताताई काकडे, सौ. माधुरीताई गोंडे, सौ. सुषमा कराड, सौ. ज्योतीताई मुंजे, सौ. सविता ढाकणे आणि सौ. सीमाताई पठाण यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या उपस्थितीने या भेटीला एक वेगळीच उंची प्रदान केली.




💠 नवे नेतृत्व, नवी ऊर्जा 💠
श्री. सुरेशजी महाजन यांच्या नियुक्तीने ओबीसी समाजामध्ये भाजपबाबत एक सकारात्मक संदेश गेला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी हे नवे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त करण्यात आले.
या भेटीदरम्यान प्रकाशजी दुर्गापुरोहित, तुळशीदासजी लांजेवार, मुन्ना सुराणा, प्रमोद धवस, वरुटकर गुरुजी, जगनभाऊ ढाकणे, विष्णुजी मुंजे, विजय पावडे, मधुसूदनजी टिपले, पंढरी वर्भे, प्रशांतजी लोहकरे आणि निब्रट साहेब यांसह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.