गडचिरोली :- अभिषेक भागडे
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत येत्या १६ एप्रिल २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात नामांकित ३५ पेक्षा जास्त खाजगी कंपन्या सहभागी होणार असून, ४००० पेक्षा जास्त रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये महिंद्रा, टाटा मोटर्स, फियाट, बजाज, एमआरएफ, फ्लिपकार्ट, डी-मार्ट यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये:
⭕ एकूण रिक्त पदे: ४०००+
⭕ सहभागी कंपन्या: ३५ हून अधिक नामांकित कंपन्या.
⭕ पात्रता: १० वी, १२ वी, पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत.
⭕ वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे.
कार्यक्रमाचा तपशील:
⭕ दिनांक: गुरुवार, १६ एप्रिल २०२६
⭕ वेळ: सकाळी १०.०० वाजता
⭕स्थळ: पोलीस मुख्यालय, गडचिरोली.
नाव नोंदणी कशी करावी?
इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधता येईल:
📞 ९४२३६२१२३१ / ९४०३७१५८०८
👉 प्रशासनाचे आवाहन:
👉 रोजगाराच्या शोधात असलेल्या जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
बातमी सौजन्य: स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा.
🙏 जय विदर्भ 🙏




