देवगड (Devgad) :- देवगडचा हापूस आंबा हा देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. हापूस आंबा विक्रीसाठी आला की या काळात फसवणुकीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत असतात. याच अनुषंगाने आता प्रत्येक आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेने घेतला आहे.
या निर्णयामुळे बोगस पद्धतीने हापूस आंब्याची विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड देण्यात येणार आहे. सध्या रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांना जीआय मानांकन मिळाले आहे.
ग्राहकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने तपासणी करता येणार आहे. 9167668899 या सन सोल्यूशनच्या अँटी-काउंटरफीटिंग व्हॉट्सअॅपच्या नंबर वर ग्राहकांनी आंब्याचा फोटो पाठवल्यास त्यावरील कोड ही यंत्रणा वाचते.




