28 November 2026News Website

साईनगर वडाळा (पैकू) येथे श्री साई मूर्ती स्थापनेचा १२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात

चिमूर :- श्री साई देवस्थान संस्थान, साईनगर वडाळा (पैकू), ता. चिमूर, जि. चंद्रपूर यांच्या वतीने साईनगर येथील श्री साई मूर्ती स्थापनेचा बारावा वर्धापन दिन दिनांक ३०/११/२०२६ ते १/१२/२०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

🟨 कार्यक्रमाची रूपरेषा 🟨

💥 सोमवार, दि. ३०/११/२०२६ :- सकाळी ५.०० वा. परिसर सफाई, सकाळी ७.०० वा. श्री. सुभाष लांबे महाराज यांच्या हस्ते मूर्तीचे अभ्यंग स्नान व पूजन, दुपारी १२.०० वा. होम हवन, सायं. ६.०० वा. सामुदायिक प्रार्थना व आरती (सहभागी : श्री गुरुदेव सेवा मंडळ वडाळा (पैकू) व श्री गु.ग्रा.वि.से.मंडळ, इंदिरा नगर चिमूर; सामुदायिक प्रार्थनेवर तालुका सेवाधिकारी श्री. भोयर सर यांचे मार्गदर्शन) आणि रात्री ८.०० वा. श्री गु.ग्रा.वि.से.भ.मंडळ, इंदिरा नगर चिमूर (श्री सतिश आडे व संच) यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

💥 मंगळवार, दि. १/१२/२०२६ :- सकाळी ७.०० वा. पालखी सोहळा (प्रांत सेवाधिकारी श्री सावरकर सर यांचे मार्गदर्शन). पालखी सोहळ्यात श्री सतसंग भजन मंडळ चिमूर, साई महिला भजन मंडळ साईनगर वडाळा, लक्ष्मी महिला भजन मंडळ वडाळा (पैकू), गुरुदेव महिला भजन मंडळ वडाळा (पैकू), मंजुळामाता महिला भजन मंडळ, इंदिरा नगर चिमूर, श्री गुरु माऊली भजन मंडळ येरखेडा, श्री. गु.म.भ.मंडळ खापरी व श्री. गु.म.भ.मंडळ पिंपळनेरी हे भजन मंडळ सहभागी होणार आहेत. सकाळी ९.०० वा. आरती, दुपारी १.०० वा. श्री साई महिला भजन मंडळ साईनगर वडाळा यांचा भजन कार्यक्रम, दुपारी ३.०० वा. महिला मंडळी साईनगर वडाळा यांच्यातर्फे महिलांचे हळदी-कुंकू, दुपारी ४.०० वा. काल्याचा कार्यक्रम आणि सायं. ६.०० वा. आरती व महाप्रसाद होईल.

डेकोरेशनची जबाबदारी आनंदे डेकोरेशन देलनवाडी यांनी स्वीकारली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री साई देवस्थान संस्थान व समस्त ग्रामवासी साईनगर, वडाळा (पैकू) परिश्रम घेत असून, निमंत्रण पत्रिका मनमोहन प्रिंटर्स वडाळा (चिमूर) ☎️ 9422577605 येथे मुद्रित करण्यात आली आहे.

अभिषेक किशोर भागडे