13 November 2026News Website

बालसंस्कारांची १५ वर्षांची परंपरा अविरत सुरू! सागरा येथे दिवाळीच्या सुट्टीत ‘सुसंस्कार शिबिरा’चा दणक्यात शुभारंभ

सागरा :- पिढ्या घडविण्याच्या आणि भावी नागरिकांमध्ये उच्च नैतिक मूल्यांची बीजे रोवण्याच्या उदात्त हेतूने सागरा येथे दिवाळीच्या सुट्टीचे औचित्य साधून ‘सुसंस्कार शिबिरा’ची आज अत्यंत उत्साहात व दणक्यात सुरुवात झाली. ‘सुसंस्कार शिबिर समिती’च्या माध्यमातून मागील तब्बल १५ वर्षांपासून सातत्याने राबविला जाणारा हा उपक्रम आज परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे मार्गदर्शक केंद्र बनला आहे.



सुंदर, व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीचा ध्यास घेतलेल्या या उपक्रमाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, यंदाही परिसरातील आजूबाजूच्या शेकडो गावांमधील विद्यार्थ्यांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. मागील १५ वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी संस्काराचे धडे गिरवून एक आदर्श नागरिक म्हणून घडत आहेत, हे या समितीचे सर्वात मोठे यश मानले जात आहे.



संस्कारांची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी

आजच्या धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात मुलांमध्ये योग्य मूल्ये रुजविणे ही काळाची गरज बनली आहे. याच वास्तवाचे भान ठेवून ‘सुसंस्कार शिबिर समिती’ गेल्या दीड दशकात अविरतपणे हा दीपस्तंभ तेवत ठेवले आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. शिबिरात मुलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकासाला पूरक असणारे विविध उपक्रम, प्रेरणादायी मार्गदर्शन, नैतिक कथा, योगासने आणि सांस्कृतिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.



परिसरातील पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाचे सवागत केले असून, गेल्या १५ वर्षांपासून या ज्ञानयज्ञाला अखंडितपणे पुढे नेणाऱ्या ‘सुसंस्कार शिबिर समिती’च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिरामुळे सागरा व परिसरातील गावांमध्ये एक नवीन चैतन्यमय आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

अभिषेक किशोर भागडे