राजुरा :- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री. हंसराज भैय्या अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा शहरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांच्या वतीने भव्य दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील मुख्य बस स्थानकासमोर पार पडलेल्या या उपक्रमात नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दुधाचे वितरण करून भैय्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार श्री. संजयभाऊ धोटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हंसराज भैय्या अहिर यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावर उतरून लढणाऱ्या आणि विकासाचा झंझावात निर्माण करणाऱ्या हंसराज भैय्यांच्या नेतृत्वाचा गौरव यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
या प्रसंगी माजी आमदार संजयभाऊ धोटे यांच्यासह सतीशभाऊ धोटे, अरुणभाऊ मस्के, राजीवभाऊ, गौरव शेट्टीवार, महादेव तपासे, संजय जयपूरकर, जनार्दन निकोडे, संजय पावडे, वाघोली गेडाम, मनोहर बोबडे, सोमेश्वरभाऊ एडलावार, बाबुजी गेडाम, नाना एडलावार, सय्यद कुरेशी, बाळनाथ वडस्कर, लक्ष्मीताई विश्वास, महेश रेगुलवार, कैलास कार्लेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





