6 November 2026News Website

वरोरात खळबळ! चिवड्यात आढळली पाल; विषबाधेमुळे ६ जण रुग्णालयात दाखल

    💥 ठळक घडामोडी 💥

  • घटना :- वरोरा येथील बस स्टॉप रोडवरील आयटीआय (ITI) लगत असलेल्या ‘मनोज चिवडा सेंटर’ येथील खळबळजनक प्रकार.
  • कारण :- चिवड्यात पाल आढळल्याने खाण्यात आलेल्या पदार्थातून सहा जणांना विषबाधा.
  • रुग्ण दाखल :- सर्व बाधित रुग्णांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या तिथे उपचार सुरू आहे.

वरोरा (प्रतिनिधी) :- वरोराहून एक अत्यंत धक्कादायक व संतापजनक बातमी समोर येत आहे. बस स्टॉप रोडवरील आयटीआय (ITI) लागून असलेल्या ‘मनोज चिवडा सेंटर’ दुकानातून खरेदी केलेल्या चिवड्यात चक्क पाल आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दूषित चिवडा खाल्ल्यामुळे तब्बल सहा नागरिकांना तीव्र विषबाधा झाली असून, वरोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर अन्नातून विषबाधा झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विषबाधा झालेल्या सर्व सहाही रुग्णांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

💥 रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची नावे 💥

  • सुवर्णा प्रवीण कोहळे (वय ४५ वर्ष, रा. माजरी)
  • प्रविन शालीकराम कोहळे (वय ५० वर्ष, रा. माजरी)
  • पंकज दिगंबर आवारी (वय ४० वर्ष, रा. राळेगाव)
  • दिगाबर विठ्ठजी आवारी (रा. राळेगाव )
  • अफजल रफीक अहेमतखान (रा. भद्रावती  / कोगाव)
  • शेख रेहमान (रा. कोरेगाव)
  •  आयुब सागीर खान ( भद्रावती )

नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

अभिषेक किशोर भागडे