Home जिल्हा स्व. ईशांत सुभाष खडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णालयात फळवाटप; ‘श्री हनुमान व्यायाम शाळा...

स्व. ईशांत सुभाष खडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णालयात फळवाटप; ‘श्री हनुमान व्यायाम शाळा व मित्र परिवार’ आणि ‘सुखकर्ता गणेश मंडळ’तर्फे आदरांजली!

वरोरा (वार्ताहर): सदैव हसतमुख आणि प्रेमळ स्वभावाचे धनी असलेले स्व. ईशांत सुभाष खडके यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ सुखकर्ता गणेश मंडळ व श्री हनुमान आखाडा (श्री हनुमान व्यायाम शाळा व मित्र परिवार) यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

यावेळी ईशांत खडके यांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांनी सांगितले की, “तुझ्या जाण्याने आयुष्यात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, तुझ्या आठवणी मात्र कायम आमच्या हृदयात जिवंत राहतील. तुझं हंसणं, तुझं बोलणं आणि तुझा प्रेमळ स्वभाव आयुष्यभर आमच्या स्मरणार्थ राहील. काळाने तुला आमच्यापासून हिरावून नेलं, पण तुझ्या आठवणी कधीच कोणाला हिरावून घेता येणार नाहीत.”

समाजुपयोगी उपक्रम राबवून आपल्या लाडक्या मित्राला आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी परमेश्वर स्व. ईशांतच्या आत्म्यास चिरशांत लाभो आणि त्याच्या कुटुंबाला हे असीम दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.

  • शोककुल / आयोजन: सुखकर्ता गणेश मंडळ, हनुमान आखाडा व श्री हनुमान व्यायाम शाळा व मित्र परिवार.