8 November 2026News Website

दिल्ली विद्यापीठ डूसू निवडणुकीत अभाविपचा डंका; चारपैकी तीन प्रमुख जागांवर ऐतिहासिक विजय!

नवी दिल्ली :- दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (DUSU) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये राष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) दमदार मुसंडी मारत चारपैकी तीन महत्त्वाच्या पदांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह अभाविपने विद्यापीठ परिसरात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

कोण ठरले विजयी शिलेदार?

या अटीतटीच्या निवडणुकीत अभाविपच्या उमेदवारांनी आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे:

  • अध्यक्ष पद: यश डाबास (ABVP) यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला.
  • सचिव पद: रिया छावडी (ABVP) यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मोठी मते घेत विजय संपादन केला.
  • सहसचिव पद: लक्ष्य राज सिंह (ABVP) यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारत विजय मिळवला.

तसेच, उपाध्यक्ष पदावर अपक्ष उमेदवार दीपांशू शोकीन विजय

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

विजयाची घोषणा झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर परिसर (North Campus) व विविध महाविद्यालयांमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजात आणि ‘भारत माता की जय’ व ‘अभाविप झिंदाबाद’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष केल्यामुळेच हा मोठा विजय शक्य झाल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी दिली आहे.

निवडून आलेले सर्व पदाधिकारी आणि अभाविपच्या तमाम कार्यकर्त्यांचे देशभरातून अभिनंदन केले जात असून, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

अभिषेक किशोर भागडे