वरोरा :- भक्ती आणि श्रद्धेचा सुगंध सर्वत्र दरवळत असताना, वरोरा नगरीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट यांच्यावतीने ‘श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा दर्शन सोहळा‘ अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा म्हणजे साक्षात स्वामींच्या कृपेचा वर्षाव असून, भाविकांना स्वामींचा आशीर्वाद व कृपाप्रसाद लाभण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
भक्तीमय कार्यक्रमाची रूपरेषा :- पालखी सोहळ्याचा हा मंगलमय प्रवास सोमवार, २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता नगरपरिषद येथून सुरू होईल. यानंतर पालखी परिक्रमा मार्ग नगरपरिषद ते जोतिबा फुले चौक, राम मंदिर, वीर सावरकर चौक असा मार्गक्रमण करत राकेश भागडे यांच्या ‘स्वामी कृपा निवास‘ या निवास्थानावर पोहचेल.
💠 सायं. ६:३० वाजता. पालखीचे आगमन व पूजन.
💠 सायं. ७:०० वाजता. श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती.
💠 सायं. ७:३० ते ९:३० वाजता. भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी भागडे परिवार, वरोरा यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे. स्वामींच्या या पावन परिक्रमेत सहभागी होऊन पुण्यलाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🙏 भागडे परिवार,वरोरा 🙏
संपर्क :- अधिक माहितीसाठी ☎️ ९४२३६४२६४६ ☎️ ८६६८३५२६४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏



