Home Breaking News महाराष्ट्राच्या विकासाला ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ची साथ: ८.३ लाखांहून अधिक नागरिक झाले लाभान्वित!

महाराष्ट्राच्या विकासाला ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ची साथ: ८.३ लाखांहून अधिक नागरिक झाले लाभान्वित!

नागपूर :- राज्याच्या सर्वांगीण विकासात खासगी क्षेत्राचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरत असून, ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. गेल्या सात वर्षांत बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमांचा लाभ राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना मिळाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विकासाच्या प्रवासातील प्रमुख टप्पे
जलयुक्त महाराष्ट्र :- जलसुरक्षेसाठी राबवलेल्या व्यापक उपक्रमांतर्गत १.०६ अब्ज लिटर गोड्या पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरण :- या उपक्रमांमधील ५२ टक्क्यांहून अधिक लाभार्थी महिला आहेत, ज्यांना ग्रामीण भागात आर्थिक स्वावलंबनासाठी बळ देण्यात आले आहे.
रोजगार आणि कौशल्य विकास :- सुमारे ६,५९८ युवकांना कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी ६३ टक्के युवकांना थेट रोजगार मिळाला आहे.
आरोग्यसेवा :- ‘सीईंग इज बिलिव्हिंग’ उपक्रमांतर्गत ४ लाख ३९ हजार ६८८ नागरिकांची नेत्रतपासणी करून ३८ हजार ६२५ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
पर्यावरण संवर्धन :- हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने सात लाख वृक्षांची लागवड करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, राज्य शासन आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विकासाचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत. हे उपक्रम शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनाला गती देणारे ठरत आहेत.