Home Breaking News अरविंद विद्या निकेतन वरोराचा 10 वीचा निकाल 100%  मुख्याध्यापकांचा व्यवस्थापन मंडळातर्फे सत्कार

अरविंद विद्या निकेतन वरोराचा 10 वीचा निकाल 100%  मुख्याध्यापकांचा व्यवस्थापन मंडळातर्फे सत्कार

वरोरा :- नुकत्याच जाहीर झालेल्या १० वीच्या परीक्षेत स्थानिक अरविंद विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखत विद्यालयाचा निकाल 100 % लावला आहे. या घवघवीत यशाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व मेहनतीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुदेव जुमडे यांचा व्यवस्थापन मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे सचिव  अमन टेमुर्डे , कोषाध्यक्ष अभिजीत बोथले  आणि संचालिका डॉ. माया रमेश राजुरकर (समाजसेविका) यांनी मुख्याध्यापक गुरुदेव जुमडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
या यशाचे श्रेय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला असल्याचे सांगत व्यवस्थापन मंडळाने समाधान व्यक्त केले. शाळेने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शिस्तीचा जो दर्जा जपला आहे, तो वाखाणण्याजोगा आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल व्यवस्थापन मंडळाने मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे आभार मानले. भविष्यातही विद्यालयाचा हा शैक्षणिक आलेख असाच उंचावत राहो आणि विद्यालयाचे नाव राज्यपातळीवर चमकत राहो, अशा शुभेच्छा व्यवस्थापन मंडळाने दिल्या आहेत.