Home Breaking News सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर याद राखा; मनसेचा बोगस बियाणे विक्रेत्यांना ‘खळ्ळ-खट्याक’चा...

सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर याद राखा; मनसेचा बोगस बियाणे विक्रेत्यांना ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा !

वणी :-यवतमाळ जिल्ह्याचा बळीराजा सध्या खरीप हंगामाच्या तयारीत गुंतला असताना, त्याच्या कष्टावर डल्ला मारण्यासाठी ‘बोगस बियाणे’ माफिया सक्रिय झाले आहेत. “शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने धडा शिकवेल,” असा थेट आणि आक्रमक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने प्रशासनाला दिला आहे.
यवतमाळ हा कापूस आणि सोयाबीनचा मुख्य पट्टा आहे. मात्र, पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात छुप्या मार्गाने प्रतिबंधित ‘HTBT’ सारखी बोगस बियाणे आणि जादा दराने विना पावती विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे शेतकरी सेनेच्या वतीने वणी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत निवेदन देण्यात आले.

🚫 मनसेच्या प्रमुख मागण्या आणि कडक भूमिका🚫
👉 भरारी पथके सज्ज करा :-कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे अचानक विक्री केंद्रांवर धाडी टाकाव्यात.
👉 परवाने कायमचे रद्द करा :- विना पावती आणि बोगस बियाणे विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने तात्काळ आणि कायमस्वरूपी रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
👉 हेल्पलाईन सुरू करा :- जिल्हा आणि तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी तात्काळ ‘हेल्पलाईन क्रमांक’ सुरू करावा.
👉 प्रशासनाला अल्टीमेटम :-जर जिल्हा ‘बोगस बियाणे मुक्त’ झाला नाही, तर होणाऱ्या तीव्र आंदोलनाला प्रशासन जबाबदार असेल.
👉 “शेतकरी हा जगताचा पोशिंदा आहे, त्याची फसवणूक आम्ही सहन करणार नाही. जर प्रशासनाने डोळेझाक केली, तर मनसे स्टाईलने बोगसगिरी करणाऱ्यांचे दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाही!
👉 महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना

🙏 उपस्थित पदाधिकारी 🙏
हे निवेदन देतेवेळी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, व्यापारी शहर अध्यक्ष राकेश वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष महेश हातगावकर यांच्यासह परशुराम खंडाळकर, विलन बोदाडकर, प्रवीण कळसकर, प्रतीक बुरडकर, अनिल टोंगे, गोविंदराव थेरे, नागेश पथाडे आणि सुनील काकड यांसारख्या वाघानखांच्या मनसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

🙏 जय विदर्भ 🙏