8 November 2026News Website

अखेर मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेंची बदली!

मुंबई (Mumbai) ३१ जुलै :- मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांची राज्य सरकारने अखेर बदली केली आहे. आयआरएस अधिकारी शिंदे २०१५ पासून महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते, आणि त्यांच्या मुदतवाढीविरोधात विरोधकांनी सातत्याने आवाज उठवला होता. शिंदे यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये कार्यकाळ संपल्यानंतरही मुंबईतच ठेवले गेले होते, यामुळे विधान परिषदेत वाद निर्माण झाला.मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची महापालिकेत वर्णी कशी लागते, आयएएस अधिकारी नसताना सुधाकर शिंदे यांना (Commissioner Sudhakar Shinde) महापालिकेत कसे स्थान मिळाले यासंबंधी प्रश्न उपस्थित केले गेले. विधानसभेत आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू, तर विधान परिषदेत अनिल परब यांनी शिंदे यांच्या नियुक्तीचा मुद्दा उचलला होता.सुधाकर शिंदे हे भाजप नेते राम शिंदे यांचे चुलत भाऊ आहेत.

पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांना भाजप नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता. पनवेलमध्ये त्यांच्या कार्यकाळात देखील वाद निर्माण झाले होते.त्यांच्या बदलीच्या आदेशात स्पष्टपणे उल्लेख केले आहे की, नोव्हेंबर २०२३ नंतर त्यांना सेवेत वाढ दिली जाणार नाही. विरोधकांनी यावरून प्रश्न उपस्थित केला आहे की, नियमबाह्यपद्धतीने नियुक्त केलेल्या शिंदे यांच्या आठ महिन्यांत घेतलेल्या निर्णयांची चौकशी होईल का आणि सरकार त्या निर्णयांना रद्द करणार का.सुधाकर शिंदे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या निर्णयांची तपासणी होईल, हे सुनिश्चित करणे सरकारच्या कडून अपेक्षित आहे.

Mumbai png
Mumbai wikipedia
Mumbai City
Mumbai map
Mumbai University
Mumbai district name
Mumbai weather
Mumbai University Login

swatantravidarbhanewsportal.com