Home Breaking News Ratnagiri: एसटीच्या शहर बसमध्येही महिला ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत

Ratnagiri: एसटीच्या शहर बसमध्येही महिला ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत

 

रत्नागिरी 22 जून :- एसटीच्या रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० सवलत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. आज, म्हणजे जूनच्या मध्यरात्रीपासून ही सवलत लागू करण्यात येत असल्याची माहिती विभाग प्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

या सवलतीकरिता ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र / राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना दिलेली ओळखपत्र (फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता अनिवार्य), पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, तहसिलदार यांनी दिलेले ओळखपत्र, डी जी लॉकर, एम आधार व एसटी महामंडळाद्वारे देण्यात आलेले स्मार्ट कार्ड ही ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात येतील.