वरोरा :-हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील शेकडो आक्रमक ‘Gen-Z’ युवकांनी युवासेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव आमदार वरूनजी सरदेसाई व शिवसेना सचिव सुरजभैय्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता, इशान प्लाझा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वरोरा येथे हा सोहळा पार पडत आहे.
🙏 दिग्गजांची प्रमुख उपस्थिती 🙏
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे अध्यक्षस्थान वरोरा-भद्रावतीचे लाडके नेते, आमदार तथा शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख मा. श्री. संजयजी देरकर भूषवणार आहेत.
विशेष अतिथी :- मा. श्री. हर्षलदादा काकडे (कार्यकारिणी सदस्य, युवासेना)
प्रमुख उपस्थिती :- राजे जयसिंग भोसले (युवा सेना सह सचिव, महाराष्ट्र राज्य)
💥 सौ. रोहिणीताई विक्रांत पाटील (युवासेना सहसचिव तथा युवती जिल्हा अधिकारी, चंद्रपूर)
💥 श्री. संदीपजी रियाल (पटेल) (युवा सेना महाराष्ट्र राज्य विस्तारक, चंद्रपूर जिल्हा)
💥 सौ. भावनाताई मिथुन खोब्रागडे (महिला आघाडी जिल्हा प्रमुख)
💥 श्री. राजेशजी नायडू (शिक्षक सेना जिल्हा प्रमुख, चंद्रपूर)
💥 श्री. नंदूभाऊ पढाल (माजी तालुका प्रमुख, भद्रावती तथा स्वीकृत सदस्य, न.प. भद्रावती)
💥 श्री. वसंताभाऊ मानकर (माजी नगरसेवक तथा माजी उपजिल्हा प्रमुख, भद्रावती)
💥 श्री. घनश्यामजी आस्वले (कामगार नेते तथा माजी शहर प्रमुख, भद्रावती)
💥 आयोजन आणि नेतृत्व 💥
या युवा मेळाव्याचे व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन आणि यशस्वी नेतृत्व शिवसेना जिल्हा संघटक तथा बांधकाम सभापती (नगर परिषद वरोरा) श्री. मनीष मुरली जेठाणी यांनी केले असून, परिसरातील युवकांमध्ये या सोहळ्याबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
💥 महत्त्वाचे आवाहन :- वरोरा व भद्रावती तालुक्यातील तमाम शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीच्या भगिनी आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
👉 श्री. नंदलाल टेमुर्डे,माजी तालुका प्रमुख तथा सरपंच, मोहबाळा.




