वरोरा :- तालुक्यातील अकोला नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या विविध समस्यांबाबत जनजागृती करण्यात आली.
प्रभातफेरीनंतर शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करणारे भाषण, कविता, कथा तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. कु. आस्था प्रवीण आत्राम, त्रिशूल अनिल सावसाकडे, कु. विरांगणा प्रशांत पेंदाम, प्रियांश पांडुरंग उमरे, तन्वीश प्रमोद रंदई आणि कु. माही महेश मरापे या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती सांगून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी सावसाकडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग उमरे, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी सदाशिव उमरे, ज्येष्ठ नागरिक शामदेवराव उमरे, विठ्ठल पुसाम, भाऊराव भोगेकर, श्रीहरी उमरे, माजी विद्यार्थी संघाचे शामराव मटाले तसेच माजी सैनिक नारायण गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. आत्मविश्वास, एकजूट आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असा संदेश यावेळी देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांचे गायन, देशभक्तीपर गीते, कथा तसेच कवायत संचलनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले.
यावेळी स्व. जमनाबाई तान्याबापू उमरे फाउंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी केले, तर आभार शामराव मटाले यांनी मानले.
कार्यक्रमाला भास्करराव चवले, गुरुदेव सेवा मंडळाचे सदाशिव नत्थूजी उमरे, केशव उमरे, गजानन उमरे, अंगणवाडी सेविका अल्का भोगेकर, आशा वर्कर पपीता काकडे, दिलीप भोगेकर, चिंतामण बुटके, लक्ष्मण भिमटे, विठ्ठल उमरे, अशोक उमरे, दीपा पेंदाम, शालिकराव घानोडे यांच्यासह विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शापोआ कर्मचारी नुतन सातपुते, गोलू घानोडे, रोशन उमरे, महेश उमरे, निखिल चवले, छोटू चवले,निराशा सावसाकडे, संदिप गजभिये, निलेश काकडे, कवडू पुसाम आदींनी सहकार्य केले.




