Home जिल्हा वरोरा येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘संत गजानन महाराज भक्त परिवार बहुद्देशीय संस्था’...

वरोरा येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘संत गजानन महाराज भक्त परिवार बहुद्देशीय संस्था’ यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण संपन्न

वरोरा :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी वरोरा येथील चिरघर प्लॉट (कमला नेहरू वार्ड) येथे ‘संत गजानन महाराज भक्त परिवार बहुद्देशीय संस्था, वरोरा’ यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. “एक पेड वीर सैनिको के नाम” आणि “एक पाऊल पर्यावरणासाठी, एक पाऊल भविष्यासाठी!” या प्रेरणादायी संकल्पनेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकसभा संघटक (चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्र) मा. श्री. मुकेशभाऊ जीवतोडे यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमाला नगरसेवक श्री. कुणाल रुयारकर (प्रभाग क्र. १०), नगरसेविका सौ. सीमा स. तडस (प्रभाग क्र. १०), नगरसेवक श्री. अभय ठावरी (प्रभाग क्र. ०९) आणि नगरसेविका सौ. सुष्मा चांभारे (प्रभाग क्र. ०९) यांची विशेष उपस्थिती लाभली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पार पडलेल्या या कार्यक्रमात संत गजानन महाराज भक्त परिवार बहुद्देशीय संस्थेचे समस्त पदाधिकारी, सदस्य तसेच चिरघर प्लॉटमधील नागरिक व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



🙏कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व रहिवासी 🙏
विनोद हुसुकले (अध्यक्ष), दत्ता तडस (उपाध्यक्ष), मधुकर वरुडकर, राहुल दागमवार, संजय राम, गोपाल कातोरे, नितीन नरडे, रितेश नोकरकार, अक्षय वंजारी, श्रीमती विद्याताई दागमवार, नानाभाऊ चांभारे, कैलास तडस, बेदुरकर काकाजी, काकडे काकाजी, मोहजे काकाजी, आत्राम काकाजी, देवूलकर काकाजी, वालणकर काकाजी, रोशन उगले, संकेत मेश्राम, रमेश सणस, हिमांशु हुसुकले, विजय बेलेकर, शंकर नागरिकर, मंगेश परचाके, कातोरे भाऊ, श्रीकांत वालणकर, राजू तुपकर, सुजल तिखट, रवी महागमकर, गणेश बोधाणे यांच्यासह चीरघर परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.