Home जिल्हा संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे सीबीएसई क्लस्टर IX व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात...

संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा येथे सीबीएसई क्लस्टर IX व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; बक्षीस वितरण समारंभाने सांगता.

वरोरा :- स्थानिक संस्कार भारती पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेली चारदिवसीय सीबीएसई क्लस्टर IX व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २४ जुलै २०२६ ते २७ जुलै २०२६ दरम्यान अत्यंत उत्साहात आणि दणक्यात पार पडली. या रोमहर्षक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला.
या क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला होता. चार दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळ, सांघिक भावना आणि उच्च दर्जाच्या कौशल्याचे प्रदर्शन घडवले.



🙏मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा 🙏
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मानकचंदजी मालू उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांनी विशेष उपस्थिती लावली. तसेच सीबीएसई निरीक्षक मुकूंद झाला , शाळेचे संचालक मंडळ, प्राचार्या राणी पटेल , उपप्राचार्या  श्रद्धा चौबे , गजानन जिवतोडे , डॉ. प्रशांत खुळे आणि  सुनील बांगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



💥 स्पर्धेतील अंतिम विजेते संघ 💥
विविध वयोगटात पार पडलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे राहिले:
👉 १९ वर्षांखालील मुले
🟡 प्रथम क्रमांक :- राहुल इंटरनॅशनल स्कूल, भोईसर, मुंबई
🟡 द्वितीय क्रमांक :-आर्मी पब्लिक स्कूल, डिघेही, पुणे
🟡 तृतीय क्रमांक :- लॅक्सीकॉन स्कूल, हडपसर, पुणे
🟡 १७ वर्षांखालील मुले :- प्रथम क्रमांक :- संजीवनी पब्लिक स्कूल, कोल्हापूर. द्वितीय क्रमांक :-न्यू ऑरेंज सिटी, वरुड, अमरावती. तृतीय क्रमांक :- संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा, चंद्रपूर (यजमान संघ)
१४ वर्षांखालील मुले :-

🟡 प्रथम क्रमांक :-एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, सांगली.
🟡 द्वितीय क्रमांक :- डिफेन्स करिअर अकॅडमी, गंगापूर, संभाजीनगर
🟡 तृतीय क्रमांक :- संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा, चंद्रपूर (यजमान संघ)



🙏 यशस्वी आयोजनासाठी परिश्रम 🙏
ही चार दिवसीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. खेळाडूंनी दाखवलेले क्रीडाकौशल्य आणि शिस्तबद्ध आयोजन यामुळे ही स्पर्धा उपस्थितांच्या स्मरणात राहणारी ठरली.